प्रा. श्री. गो. काशीकर - लेख सूची

चर्चा- ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय?

सामान्यतः विवेकवादी विचारवंत विश्वाच्या ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय नाही असे आग्रहाने प्रतिपादन करतात. परंतु टाइम्स ऑफ इंडियाच्या दि. ९ एप्रिल १९९५ च्या रविवार-पुरवणीत ‘सूक्ष्मवैश्विक क्रान्तदर्शने (Microcosmic visions) ह्या शीर्षकाखाली अनुराधा मुरलीधर यांनी जी माहिती दिली आहे ती त्यांना आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करायला लावील अशी आहे. मुरलीधर म्हणतात डॉ. अॅनी बीझंट व त्यांचे सहकारी सी. डब्ल्यू. लेडबीटर …

धारणाद्धर्म इत्याहुः।

आजचा सुधारक च्या ऑगस्ट १९९३ च्या अंकात उपरोक्त विषयावरील माझ्या आधीच्या लेखांवर टीका करणारा श्री वसंत पळशीकर यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी आधीच्या सर्व अंकांतील तत्संबंधीचे सर्व लेख सलगपणे वाचून काढले; परंतु त्यांत त्यांना आक्षेप घेण्यासारखे बहुधा काही न आढळल्यामुळे वेगळ्या दिशेने मुद्दयाला भिडायला हवे असे त्यांनी ठरवून हा लेख लिहिलेला दिसतो. . त्यांचा …

‘धारणाद्धर्म इत्याहुः’ – प्रा. देशपांडे यांना उत्तर

धर्म म्हणजे रिलिजन नव्हे; धर्माचे मुख्य स्वरूप समाजधारणेचे म्हणजे ऐहिक स्वरूपाचे आहे ह्या माझ्या विधानाच्या समर्थनार्थ माझ्या लेखात मी धर्मशास्त्राचे गाढे व्यासंगी व विद्वन्मान्य लेखक भारतरत्न म. म. डॉ. पां. वा. काणे यांनी केलेली धर्माची व्याख्या उद्धृत केली होती. (आजचा सुधारक, फेब्रु. १९९३). परंतु प्रा. देशपांडे यांना ती विचारात घेण्यासारखी वाटली नाही. त्यावर त्यांची टीका …

चर्चा – ‘धारणात् धर्म इत्याहुः।’ – दुसरी बाजू

‘आजचा सुधारक’च्या नोव्हें-डिसें. ९२ च्या अंकात ‘धारणात् धर्म इत्याहुः ।’ ह्या शीर्षकाखाली प्रा. मा.गो. वैद्य यांच्या पुस्तकातील ‘धर्म’ कल्पनेला विरोध करणारा प्रा. दि.य. देशपांडे यांचा लेख आला आहे. प्रा. वैद्य धर्म म्हणजे religion नव्हे असे म्हणतात, तर प्रा. देशपांडे यांचा आग्रहअसा की गेली दीडशे वर्षे धर्म म्हणजे religion हेच समीकरण अस्तित्वात आहे. इंग्रजी भाषेत ‘धर्म’ …

आता नवविवेकवादाची गरज आहे

‘आजचा सुधारक’च्या फेब्रुवारी १९९२ च्या अंकात प्रा. दि. य. देशपांडे यांच्या गीतेवरील लेखांवर आक्षेप घेणारा माझा ‘हे विवेकवादी विवेचन नव्हे!’ हा लेख व त्यावरील प्रा. देशपांडे यांचा मर्यादित खुलासा प्रसिद्ध झाला आहे.ह्या मर्यादित खुलाशातही मी उपस्थित केलेल्या मुद्यांना सोयीस्कर कलाटणी देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, मोक्षशास्त्र हे बुद्धीच्या आवाक्यापलीकडे आहे असे मी म्हटलेले नाही. उलट, विज्ञान …

धर्म, धर्मनिरपेक्षता, इ.

आजचा सुधारकच्या मे, जून व जुलै च्या अंकांतून श्री. दिवाकर मोहनी यांनी ‘धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यांमधून उद्भवणारे काही प्रश्न हा शीर्षकाखाली हिंदुधर्म, हिंदुत्ववादी, मुस्लिम समस्या, रामजन्मभूमीचा प्रश्न इ. विषयांवर चर्चा सुरू केली आहे. त्यांतून त्यांनी हिंदुत्ववाद्यांवर टीकेची झोड उठविली आहे. श्री. मोहनी यांची भूमिका तत्त्वचिंतकाची आहे. ह्या भूमिकेतून ‘हिंदुधर्म ह्या संकल्पनेची चिकित्सा करताना त्यांनी तर्कावर …